Ad will apear here
Next
भाजप अनुसूचित जाती मोर्चाची बैठक उत्साहात
भाजप अनुसूचित जाती मोर्चातर्फे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना मोर्चाचे केंद्रीय महासचिव रमेशचंद्र रत्न.मुंबई : भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांची बैठक दादर येथील वसंत स्मृती भाजप कार्यालयात झाली.

प्रदेशाध्यक्ष सुभाष पारधी या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे केंद्रीय महासचिव रमेशचंद्र रत्न यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘अनुसूचित जाती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागाची आठवण ठेवून समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.’

बैकीला उपस्थित पदाधिकारीप्रदेशाध्यक्ष पारधी यांनी, मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षवाढीसाठी योगदान देणे महत्त्वाचे असल्याचे सांगून, संघटनेकडे लक्ष देणे गरजेचे आहे अशी सूचना केली. रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतिपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.

चंद्रकांत हिवराळे यांनी सूत्रसंचालन केले, तर सुखदेव अडागळे यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZYMBF
Similar Posts
रामनाथ कोविंद यांच्या निवडीबद्दल भाजप अनुसूचित जाती मोर्चातर्फे आनंदोत्सव मुंबई : रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतिपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने लाडूवाटप करण्यात आले. हा कार्यक्रम भाजपच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झाला. या वेळी मोर्चाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय
‘सामान्य कार्यकर्ता देशाचा राष्ट्रपती’ नागपूर : ‘पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, ज्याने कोणत्याही अपेक्षेशिवाय संघटना वाढविण्यावर भर दिला, तो कार्यकर्ता ६५ टक्के जास्त मते घेऊन देशाच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. हा करिष्मा फक्त भाजपमध्येच होऊ शकतो,’ असे प्रतिपादन आमदार सुधाकर कोहळे यांनी केले.   रामनाथ कोविंद भारताचे १४वे
‘भारताच्या अफाट प्रतिभेचा सेवा क्षेत्रांना नैसर्गिक लाभ’ मुंबई : ‘सेवा क्षेत्र हा जागतिक अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आणि विस्तारणारा घटक आहे. रोजगार, मूल्यवर्धन, उत्पादकता आणि नवसंशोधन याबाबतीत सेवा क्षेत्राचे आज वर्चस्व आहे. या उपक्रमामुळे भारतीय सेवा क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि जागतिक सेवा क्षेत्राबरोबर भारताचे संबंध अधिक दृढ होतील,’ असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीप्रीत्यर्थ पुण्यात जल्लोष पुणे : भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी, ३० मे २०१९ रोजी शपथ घेतली. सलग दुसऱ्यांदा ते या पदावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याप्रीत्यर्थ पुण्यात ठिकठिकाणी मोदी समर्थकांनी जल्लोष केला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language